दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं- देवेंद्र फडणवीस

0
313

औरंगाबाद :  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मराठवाड्यातील पाणी प्रश्नी उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणाला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी महाआघाडी सरकारवर निशाणा साधला.

दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, जर मराठवाड्याचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं .

तुम्हाला क्रेडिट हवं असेल तर घ्या, नाव बदलायच तर बदला, अजून काही बदल करायचे ते करा पण ही योजना मराठवाड्यासाठी आहे. योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन लढाई लढू, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळात मराठवाड्यावर अन्याय होत आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावरच कळेल”

बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु, त्यांच्या तलमीत मी तयार झालो- नारायण राणे

राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात- संदिप देशपांडे

“अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here