Home महाराष्ट्र “परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली म्हणून मी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो”

“परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली म्हणून मी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं  तर काँग्रेस पक्षाला एकाही राज्यात चांगली कामगिरी करता आली नाही. यावरुन आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहित होतं. त्यामुळे मी परमेश्वराचे आभार मानतो की, मला दुरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो, असं म्हणत सुजय विखे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

हे ही वाचा : आरोप सिद्ध झाल्याशिवाय, नवाब मलिकांचा राजीनामा नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र काँग्रेस पक्ष लाचार बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी आहे. काँग्रेसने आता 40 ने शुन्य होण्याची वाट पहावी आणि नवी सुरूवात करावी, असंही सुजय विखे म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुरी येथे वयोश्री योजनेतून मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांनी दिला राज ठाकरेंना सल्ला; आता राज ठाकरे म्हणतात…

मुंबईत कपलने सर्वांसमोर केलं खुल्लम खुल्ला किसींग, पहा व्हिडिओ

“राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”