Home महाराष्ट्र आरोप सिद्ध झाल्याशिवाय, नवाब मलिकांचा राजीनामा नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

आरोप सिद्ध झाल्याशिवाय, नवाब मलिकांचा राजीनामा नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार होत आहे. तसेच मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपनं जोरदार आंदोलनही केलं. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

कोणत्या मंत्र्याला तुरुंगात ठेऊन त्यांचे राजीनामे घ्यायचे हे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. एखादा गुन्हा सिद्ध झाला तर मंत्र्यांचा राजीनामा घेणे समजू शकतो. अनिल देशमुख यांच्याबाबत त्यांनी राजीनामा स्वत:हून दिला. त्यानंतर देशमुखांवर अनेक गुन्हे लावण्यात आले. 95 वेळा त्यांच्या विविध निवास ठिकाणी छापे मारणे सुरू आहे. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक होत आहेत ही धारणा सर्वांची झाली आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

हे ही वाचा : संजय राऊतांनी दिला राज ठाकरेंना सल्ला; आता राज ठाकरे म्हणतात…

नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली असती तर ते समजूत घालू शकले असते, पण त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना उलट माहिती देऊन स्पष्टीकरण देण्याची संधी द्यायला हवी होती. त्यामुळे त्यांचे राजीनामे आम्ही घेत बसणे योग्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईत कपलने सर्वांसमोर केलं खुल्लम खुल्ला किसींग, पहा व्हिडिओ

“राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

मला तर असा संशय आहे की, शरद पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे- निलेश राणे