Home महाराष्ट्र नुसतं बोलण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत...

नुसतं बोलण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- छत्रपती संभाजीराजे

सोलापूर : नुसतं बोलण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा, असं म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. आज सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात ते बोलत होते.

राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर तुम्हाला जे राजकारण करायचेय ते करत बसा, असं म्हणत संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, तसेच आता सकल मराठा समाजाचा आवाज महाराष्ट्रात घुमायला पाहिजे. तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे, असं आवाहनही संभाजीराजे यांनी मराठा समाजाला केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही- उदय सामंत

मंदिर नाही पण मदिरा सुरु, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का?- संजय राऊत

फडणवीसजी, आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला