आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरे यांना लवकरात लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे. तसेच क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या मास्कबाबतच्या पत्राची आठवण करुन देत त्यांनी हे पत्रं ट्विटरवर शेअर केलं आहे.
गेट वेल सून’ राज ठाकरे जी, मी आपणांस एका पत्राद्वारे मास्क परिधान करण्याची विनंती केली होती. तज्ञ नेहमी सांगतात की मास्क हे एक कवच आहे, जे आम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवते. आपण आतातरी मास्क परिधान करा. आपण लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी माझी ईश्वर चरणी प्रार्थना, असं क्लाईड क्रास्टो म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा, तरीही सरकार पडणार नाही”
दरम्यान, क्लाईड क्रास्टो यांनी 6 मार्च 2021 रोजी राज ठाकरेंना पत्र पाठवले होतं. त्या पत्रात राजसाहेब, तुम्ही लोकांसाठी एक प्रेरणा आहात, आपण जे बोलता त्या प्रत्येक शब्दाचं पालन आणि अनुकरण केलं जातं. आपला एका मोठा चाहता वर्ग आहे. आपण त्यांचे गुरू, मित्र आणि मार्गदर्शक आहात. आपली भाषणं केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशात पाहिली जातात. त्यामुळे कोविड विरुद्धच्या लढाईत आपली भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, की राजसाहेब तुम्ही मास्क घाला, असं क्रास्टो यांनी पत्रात म्हटलं होतं.
‘गेट वेल सून’ राज ठाकरे जी,
मी आपणांस एका पत्राद्वारे मास्क परिधान करण्याची विनंती केली होती.
तज्ञ नेहमी सांगतात की मास्क हे एक कवच आहे, जे आम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवते.
आपणही आता मास्क परिधान करा.
आपण लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी माझी ईश्वर चरणी प्रार्थना#RajThackeray pic.twitter.com/i9TTj6XKqY— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) October 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने सपशेल माफी मागावी; भाजपच्या ‘या’ आमदाराची मागणी
शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन अजित पवारांची मोठी खेळी; उदयनराजेंचे मनसुबे उधळणार
राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे करणार उद्घाटन