अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांना कोरोनामुळं निधन झालं आहे.
कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनावरील उपचारादरम्यान दिलीप गांधी यांची आज पहाटे दिल्लीत प्राणज्योत मालवली.
दिलीप गांधी हे संघ परिवारात मोठे झाले तसेच भारतीय जनता पक्षाशी ते कायम एकनिष्ठ राहिले. दिलीप गांधी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले. तसेच एक वेळा त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवलं.
दरम्यान, 2003 ते 2004 यादरम्यान भाजप सरकारच्या कार्यकाळात दिलीप गांधी यांनी केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
महत्वाच्या घडामोडी –
जोस बटलरच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडचा मोठा विजय; मालिकेत 2-1 ने आघाडी
…तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्य्या महाराष्ट्राला सांगणार; निलेश राणेंचा इशारा
अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का?; यावर शरद पवार हसून म्हणाले…
भारत Vs इंग्लंड दुसरा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय