आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 6 विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्व बाद 172 धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. अक्षरने आपल्या खेळीत 4 चाैकार, 5 षटकार ठोकले. तर कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. वाॅर्नरच्या या खेळीत 6 चाैकरांचा समावेश होता. तर मुंबईकडून पीयूष चावला, जेसन बेहरनडाॅर्फने सर्वाधिक 3, तर राईली मैरेडिथने 2, शोकीनने 1 विकेट घेतली.
ही बातमी पण वाचा : बाबरी पाडताना तिथे प्रत्यक्ष शिवसैनिक कुणी नव्हतं; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना , मुंबईने हे लक्ष्य 4 विकेट गमावत 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या या खेळीत 6 चाैकार, 4 षटकार ठोकले. तर तिलक वर्मा 29 चेंडूत 1 चाैकार, 4 षटकारांसह 41 धावा, इशान किशन 26 चेंडूत 6 चाैकारांसह 31 धावा, टीम डेव्हिड 11 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 13 धावा, तर कॅमेरून ग्रीनने 8 चेंडूत 1 चाैकार, 1 षटकारासह नाबाद17 धावा करत मुंबईच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. तर दिल्लीकडून मुकेश कुमारने 2, तर मुस्तफिजूर रेहमानने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी
“ठाकरे-पवारांमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर सव्वा तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”
ही आहे राज ठाकरेंची पॉवर; ज्याने ललकारलं, आता तोच नेता म्हणतोय राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू
“चिन्नास्वामीवर स्टाॅयनिस, पूरनचं वादळ; अटीतटीच्या सामन्यात लखनाैचा RCB वर शेवटच्या चेंडूवर विजय”