आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
यानंतर आता शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या हकालपट्टीचं सत्र सूरू आहे. अशातच आता आणखी 2 बंडखोर आमदारांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त खोक्याचीच भाषा कळते; शिंदे गटाची टीका
उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायांचा ठपका ठेवत यशवंत जाधव आणि उदय सामंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज-उद्धव एकत्र येणार का?; बाळा नांदगावकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…