सातारा : काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत, असं काँग्रेस नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान काल सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकार शेतकऱ्यांवर जुलुम करत असताना महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला. सत्तेसाठी काहीही करायचे हे भाजपाचे तंत्र आहे परंतु हा देश राज्यघटनेच्या तत्वानुसारच चालेल. काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“धक्कादायक! 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह 3 जणांचा सामुहिक बलात्कार”
दंडुकेशाही योग्य नाही, सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
छगन भुजबळ यांनी कोणतंही चुकीचं काम केलं नव्हतं- गुलाबराव पाटील
केंद्र सरकारच्या पत्रानंतरच राणे कुटूंबियावर कारवाई- दिलीप वळसे पाटील