आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला पराभवाचा धक्का बसला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
निवडणुकीमध्ये देवाला टाकले तरी पराभव झाला. त्यामुळे धार्मिक मुद्यावर निवडणूक जिंकल्या जाणार नाही, असा सूचक सल्ला छगन भुजबळांनी यावेळी दिला. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : तब्बल 9 तासांनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताच, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ज्या अर्थी दंगलींना सुरुवात झाली, त्याअर्थी निवडणूक जवळ आली. जिथे जिथे निवडणूक आली, तिथे हिंदू मतांना आकर्षित केलं जात आहे. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंग बलीचा वापर झाला. शेवटी काय तर पराभव झालेला दिसून आला., असा टोला भुजबळांनी यावेळी भाजपला लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
लोकशाही मान्य नसलेला पक्ष म्हणजे भाजप; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
“निवडणुकीला आम्ही नाही तर भाजप घाबरते”