Home महाराष्ट्र तब्बल 9 तासांनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताच, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तब्बल 9 तासांनंतर ईडी कार्यालयाबाहेर येताच, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवलं होतं.

जयंत पाटील यांना आज 22 मे रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार जयंत पाटील हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. तब्बल 9 तासानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर आले. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ई़डी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटलांनी प्रसारमाध्यम आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ही बातमी पण वाचा : लोकशाही मान्य नसलेला पक्ष म्हणजे भाजप; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होता. तुम्ही थांबलात तुमचे आभार. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडलं, असं जयंत पाटलांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आयएल अँड एफएसच्या कंत्राटांशी माझा कधीही संबंध आला नाही. तसेट पुन्हा जेंव्हा बोलवण्यात येईल, तेव्हा चौकशीला येणार असल्याचं ईडीला सांगितलं आहे, असंही जयंत पाटलांनी यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे बोलल्या, म्हणाल्या, लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…

“निवडणुकीला आम्ही नाही तर भाजप घाबरते”

“सोलापूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश”