Home महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी या पत्रात केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.

भारताच्या संविधानाप्रती जागरुकता निर्माण व्हावी,भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून बारामती लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत. हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची आवश्यकता आहे., असं सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटलं आहे.

यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की,कृपया महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय अथवा निमशासकीय जागेवर संविधान स्तंभ उभारण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा.संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी हे आवश्यक आहे., असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपण यावर नक्की सकारात्मक निर्णय घ्याल हा विश्वास आहे., असं विश्वास सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

सर्वांसाठी लोकल लवकरच सुरू करणार- उद्धव ठाकरे

हेच काय आपले प्रजासत्ताक?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर- अतुल भातखळकर

अमृता फडणवीसांची ठाकरे कुटुंबावर टीका; म्हणाल्या…