Home महाराष्ट्र “प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास”

“प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास”

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक फुलांची मनमोहक आरास करण्यात आली. 3 रंगांच्या फुलांचा वापर करत तिरंगा साकारण्यात आला असल्याने मंदीर खुलून दिसत आहे.

आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदीराच्या गाभाऱ्यात व मंदीरात आकर्षक फुलांची तिरंगा रूपी सजावट करण्यात आली आहे. याकरिता झेंडू, शेवंती, कामिनी या 3 प्रकारच्या व 3 रंगाच्या 150 किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, 26 जानेवारी निमित्त शासकीय सुट्टी असल्यानं विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. मुख दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मंदिरात फुलांच्या सुंदर आराशीचं मनमोहक दर्शन घडत आहे.

देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीरही यात सहभागी झालं आहे.

पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांमध्ये देवाचं रुप अधिकच खुलून दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सर्वांसाठी लोकल लवकरच सुरू करणार- उद्धव ठाकरे

हेच काय आपले प्रजासत्ताक?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर- अतुल भातखळकर