आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटी विलिनीकरणाचा तिढा अणखी वाढतचं चालला आहे. राज्य सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचं विलिनीकरण शक्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : आधी नितेश राणेंचं म्याव म्याव, मग मलिकांचा ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा पलटवार
“एसटीचं विलिनीकरण कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाका. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार नाही. कुणाचेही सरकार असेल, तरी ते शक्य होणार नाही. पगारवाढीमुळे भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे एसटी विलिनीकरण करता येणार नाही,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील जनतेचे मात्र हाल होतं आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांतील संघर्ष दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; ओमिक्रॉनवरुन मनसेचा ठाकरे सरकारला टोला
“शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट; भाजप-मनसे युतीवरून चर्चांना उधाण”
भाजपामध्ये राजकीय भूकंप; ‘या’ दोन नेत्यांसह, 4 आमदारांनी पक्ष सोडला