एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले; शिंदे गटाच्या या आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट

0
297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी”

एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले. संजय राऊतांसारखी लोक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर मोठे झाले आहेत, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

एकनाथ शिंदे हे पैसे वसुल करणारे किंवा खंडणी घेणारे नेते नाहीयेत. ते लोकांना दोन हातांनी दान देणारे आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर किती पैसे दिले असतील, हे त्यांनाच माहीत नसेल. त्यामुळे संजय राऊतांसारख्या माणसाने आरोप करताना हे पाहिलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशावरच त्यांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर तुम्ही (संजय राऊत) मोठे झाले आहात. आता त्यांनाच तुम्ही नावं ठेवत आहात. एकनाथ शिंदे उदार मनाचा माणूस आहे, त्यांनी सगळ्यांना भरभरून दिलं आहे. , असंही संजय गायकवाड म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

16 आमदार अपात्र ठरणार नाहीत, अजित पवारांच्या विधानावर, आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे ठाम; जागा वाटपांवरून आघाडीत बिघाडी?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here