Home महाराष्ट्र “ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही”

“ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही”

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

ईडीची नोटीस राजकीय हेतूने दिली आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटी या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे. आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”

शरद पवार यांना पाठवलेली नोटीस का मागे घेतली?- नवाब मलिक

…तर उत्तर द्यावेच लागेल; ईडी नोटीसवरुन किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल

“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”