“ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा, तरीही सरकार पडणार नाही”

0
348

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : विरोधी पक्षाकडून सरकार पडण्याची वक्तव्ये वारंवार केली जात आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना सुनावलं आहे.

ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा, असं म्हणतानाच तरीही हे सरकार काही पडणार नाही, असा उपरोधक टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे. तसेच कुणी कितीही फडफड आणि बडबड करू द्या त्या कावळ्यांची पिसे झडून जातील, चोची तुटून जातील. पण हे सरकार मजबूत राहील, अस दम संजय राऊतांनी विरोधकांना भरला.

हे ही वाचा : शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने सपशेल माफी मागावी; भाजपच्या ‘या’ आमदाराची मागणी

दरम्यान, दिल्लीत मी जिथे राहातो. त्या ठिकाणी डोमकावळे आहेत. याबरोबर येथे काही चांगल्या प्रकारचे मोर सुद्धा आहेत. काही वेळा माझ्या आजूबाजूला मी डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचे सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही., असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन अजित पवारांची मोठी खेळी; उदयनराजेंचे मनसुबे उधळणार

राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे करणार उद्घाटन

माझ्यामागे ED लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे; भाजपच्या आणखी एक नेत्याचं मोठं वक्तव्य

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here