पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली- नाना पटोले

0
182

रायगड : राज्यात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनलंय. तसेच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीसारशीमुळे अनेकांचे जीव जात आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केलीय. त्यांच्या अहंकारामुळे देश स्मशानभूमी बनला असल्याची टीका पटोले यांनी केलीय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थट्टा करण्याचं काम केंद्र सरकारनं आणि भाजपनं केलं, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला. नाना पटोले आज तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी रायगड दौऱ्यावर होते. त्यानंतर अलिबाग येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, केंद्र सरकारचा ढिसाळपणा, नियोजन शून्यता, जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या नियमांचं पालन न करणं, यामुळेच देशाची स्मशानभूमी बनलीय, अशी टीका नाना पटोलेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

कोण रे बाबा तू सल्ला देणारा; निलेश राणेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल

“…पर मुख्यमंत्री खाली हांथ गए और खाली हांथ आए”

कोरोना संकटात आरबीआयचे पैसे लसीकरणासाठी वापरा; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

“मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान, तुम्ही खरंच बेस्ट CM आहात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here