Home महाराष्ट्र धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच मराठवाड्यातील सर्वच धरणं तुडूंब भरले असून अनेक नद्यांनी पात्र सोडल्यानं नद्यांचं पाणी शेतात शिरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात सतत पाऊस पडतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. आपद्ग्रस्त शेतकरी, नागरिकाना तातडीने मदत पोहचवा, असेही निर्देशही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.

महत्वाच्या घडामोडी –

“आदित्य ठाकरेंकडून भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

अंडरवल्डकडून धमकीचा फोन! शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यात पुन्हा वाद सुरू

राजीनाम्यानंतर अखेर नवज्योतसिंग सिद्धूंनी सोडलं माैन, म्हणाले…

…तर आपली सीट शंभर टक्के निवडून आली म्हणून समजा- सुप्रिया सुळे