मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकाटावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश आहे., असं रोहित पवार म्हणाले.
उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!”, असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला.
उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“13 राज्यातील सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच BEST CM! पटकावलं नंबर 1 स्थान”
मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की…; पुण्यातील घटनेवरुन चित्रा वाघ संतापल्या
“देवेंद्र फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणुस”
“….पण जनता तुम्हाला ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही”