मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करु नका. शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्या, असं ट्वीट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी आपलं दु:ख तुमच्यासमोर मांडताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं. त्यावेळी तुम्ही त्या शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं. आता याचीच आठवण आम्ही तुम्हाला करुन देत आहोत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
सत्तेसाठी तुम्ही जनादेशाचा अपमान करुन सरकार स्थापन केलं. आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करु नका. शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्या. त्यांना तुम्ही जे आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करा!
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 17, 2019
सत्तेसाठी तुम्ही जनादेशाचा अपमान करुन सरकार स्थापन केलं आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली होती, असंही ते म्हणाले.
यावेळी आपलं दु:ख तुमच्यासमोर मांडताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं. त्यावेळी तुम्ही त्या शेतकऱ्याला आश्वस्त केलं होतं. आता याचीच आठवण आम्ही तुम्हाला करुन देत आहोत.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 17, 2019
महत्वाच्या घडामोडी-
-मी राष्ट्रवादी नाही तर ‘या’ पक्षात जाण्यास इच्छुक- एकनाथ खडसे
-माझी जात वंजारी आहे आणि हा कायदा माझ्या जातीविरुद्ध- जितेंद्र आव्हाड
-आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध कारायला प्रोब्लेम काय?- शशांक केतकर