मुंबई : मुंबई मेट्रोसाठी त्यावेळी फडणवीस सरकारने कांजुरमार्गच्या जागेचा विचार केला होता, आणि त्याचा पुरावा म्हणजे त्यावेळी श्रीमती अश्विनी भिडे यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिलं होतं, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. यावर भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा संपूर्ण घटनाक्रम महाविकास आघाडी सरकारच्या साैनिक कमिटीच्याच अहवालात नमूद असून, कांजुरमार्ग नव्हे तर आरेचीच कशी योग्य जागा आहे, हे याच सरकारच्या समितीने सांगितलंय. त्यामुळे तज्ञांच्या कमिटीपेक्षाही जास्त अक्कल सावंत यांना आहे का? असा सवाल यावेळी शेलार यांनी सचिन सावंतांना केला आहे.
दरम्यान, मुद्दा हा आहे की, जागा राज्य सरकारची की केंद्र सरकारची असा नसून खाजगी व्यक्तींनी या जागेवर केलेल्या दाव्यांचा आहे. त्याचप्रमाणे, स्वत:च्याच सरकारने नेमलेल्या सौनिक कमिटीच्या अहवालावर या सरकारचा विश्वास नाही का?, असाही प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
“पंढरपूर-मुंबई आज मराठा आक्रोश मोर्चा”
… हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका
बेंगलोरचं विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगलं; रंगतदार सामन्यात हैदराबादचा 6 गडी राखून विजयी
सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार- नितेश राणे