तुम्ही कंगणाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला सवाल

0
1013

मुंबई : शिवसेनेकडून अभिनेत्री कंगणा रणाैतवर होणाऱ्या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मला वाटतं, शिवसेनेला आणि शिवसेना नेत्यांना कंगणाशिवाय दुसरा विषय सापडत नाही. एका बाजूला शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता असलेले संजय राऊत कंगणा विषय आमच्यासाठी संपला असे म्हणतात. तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्यासारखे शिवसेनेचे इतर नेते कंगणा पळून गेली म्हणतात. एखाद्या महिलेबाबत कितीवेळा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलावं? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला केला आहे.

कंगणाच्या कोणत्याही विषयाचं आम्ही समर्थन करत नाही. परंतू कोरोनाचं अपयश, राज्याची इतर गोष्टींमध्ये झालेली दुरावस्था याच्यावरुन लक्ष हटवण्यासाठी हेच कंगनाच्या नावाने ओरडत आहेत. पुन्हा भाजपला कंगनाविषयावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुम्ही कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का? असा प्रश्नही प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही; निलेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

आग्रातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार- योगी आदित्यनाथ

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटलं नाही?; गुलाबराव पाटलांचा सवाल

ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं?; चंद्रकांत पटलांचा शिवसेनेला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here