मुंबई : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हिंगणघाटातल्या आमच्या बहिणीचा जीव गेला. पोलिसांना बंदूका फक्त हवेत गोळी मारायला दिल्या आहेत काय? असा सवाल करत निलेश राणें यांनी संताप व्यक्त केला आहे.
हिंगणघाटातल्या आमच्या बहिणीचा जीव गेला. पोलिसांना बंदूका फक्त हवेत गोळी मारायला दिल्या आहेत काय?? त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा. एक उधारण होऊ द्या की महाराष्ट्रात मुलींना/महिलांना नाय त्या नजरेने कोणीही बघू शकत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 10, 2020
त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा. एक उधारण होऊ द्या की महाराष्ट्रात. त्यामुळे महाराष्ट्रातील मुलींना आणि महिलांना त्या नजरेने कोणीही बघू शकणार नाही, असंही निलेश राणे म्हणाले.
दरम्यान , जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा, असं म्हणत पीडितेच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन भाजपला भाड्याने दिलं आहे
अजित पवार थोड्या दिवसांनी शिवसेनाही चालवतील- मनसेचा शिवसेनवर पलटवार
“असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये”