कराड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकातं पाटील हे उंडाळे (ता.कराड) येथे माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी भाजपच्या वतीने आम्ही राज्यभर उठाव करणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या महिला शाखेच्या वतीनं कालच एक पत्रक प्रसिद्ध करून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे, असं पाटील म्हणाले. ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो, असंही पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“हिंदू धर्मात 2 पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील”
“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही”
“आमच्या विरूद्ध 3 पैलवान एकत्र आले, तरी आम्ही पुणे महापालिका जिंकू”