देवेंद्र फडणवीस यांना उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे- अनिल गोटे

0
1367

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन यांना उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे, असं अनिल गोटे म्हणाले.

तत्कालीन फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र अक्षरशः ओरबाडून काढला आहे. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करत आहे. मी याचे पुरावे सादर करू शकतो. मी पुराव्याशिवाय आणि कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही, असंही अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या इतकं भ्रष्ट सरकार यापूर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं, तसंच फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

-राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, मनसे भाजपसोबत जाणार?

-स्वतंत्र काश्मीरवरुन निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा, म्हणतात…

-‘ठाकरे ‘आडनाव नंसतं तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते – गुलाबराव पाटील

-सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचं जोरदार प्रत्यृत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here