आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडीओ टीव्हीवरून प्रसारीत केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आज विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी सभागृहात हा विषय लावून धरला.
ही बातमी पण वाचा : विरोधी पक्षातून, सरकारमध्ये आल्यावर कोणता फरक जाणवतो; अजित पवारांनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…
त्यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर देताना महत्वाची घोषणा केली आहे.
“हा प्रकार समोर आलाय. आपल्या काही तक्रारी असतील, तर आम्हाला द्या. गृहितिकांच्या आधारावर चौकशी होत नाही. काही ठोस असेल तर आमच्याकडे द्या आम्ही त्याची सखोल चौकशी करु. कोणाला पाठिशी घालणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“कोण महिला आहे, ती ओळख उघड करता येत नाही. या केसपुरता ती ओळख पोलिसांना सांगितली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून शोधून काढतील. अशी आयडेंटी ओळख जाहीर करता येत नाही” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवार-अजित पवार भेटीवर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….