Home महाराष्ट्र शरद पवार-अजित पवार भेटीवर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

शरद पवार-अजित पवार भेटीवर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीतील फुटीला 15 दिवसही उलटले नाही तोच राष्ट्रवादीचे अजित पवारांसह सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड

‘ही भेट झाल्याची मला कल्पना नाही, पण भेट घेतली तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही. वर्षानुवर्ष शरद पवार साहेब त्यांचे नेते आहेत. नवीन काही राजकीय समीकरण होईल, असं मला वाटत नाही,’ असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, ‘शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. सर्वांनी नमस्कार करून आशिर्वाद मागितला. शरद पवारांना विनंती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहू शकतो, असा प्रयत्न करावा. शरद पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. शरद पवारांना न कळवता आम्ही भेटायला आलो आहोत,’ असं प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड

कृषीमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांची पहिली प्रत्रिक्रिया; म्हणाले…

अजित पवारांकडे अर्थखातं दिल्यावर, एकनाथ खडसेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले…