आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पुण्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एका लग्ननात एकत्र येत चर्चा झाली. ही बातमी ताजी असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे.
गोव्यात सध्या निवडणुकांचा धुरळा उडतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी गोव्याच्या प्रचारात उतरले आहेत. शिवसेना आणि भाजप पूर्ण जोर लाऊन लढत आहे. देवेंद्र फडणवीसही गोव्याचे प्रभारी असल्याने गोव्यातच होते. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही गोव्यात शिवसेनेच्या प्रचाराला गेल्या होत्या. गोव्यात प्रचार जरी एकमेकांविरोत करत असले तरी सकाळी दोघं एकाच विमानाने मुंबईला आले आहेत. फडणवीसांच्या विमानात महापौरांना लिफ्ट मिळाली आहे.
हे ही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंनी साधला संवाद, राजकीय चर्चांना उधाण”
महापौर गोव्याच्या प्रचारात असतानाच अचनाक लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली. मुंबईच्या पहिल्या नागरिक असणाऱ्या महापौर पेडणेकर यांना पणजी येथून मुंबईकडे सकाळी फ्लाईट मिळत नव्हती. त्यानंतर फडवणीस यांच्याशी महापौर पेडणेकर यांनी संपर्क करत गोवातून येणाऱ्या चार्टरमध्ये लिफ्ट घेतली. फडवणीस, गोवा सीएम प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर प्लेनने गोव्यातून मुंबईला आले. याच विमानातून महापौर पेडणेकर यांना मुंबईत आणण्यात आले.
दरम्यान, फडणवीस आणि महापौर यांच्यातील राजकीय वाद, तसेच महापौर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका. शिवेसना आणि भाजपा उडत असलेले दररोज खटके अशातच नाजूक प्रसंगात महापौर आणि फडवणीस यांचा राजकीय प्रवास चर्चेचा विषय ठरलाय.
महत्वाच्या घडामोडी –
“मला चिरडायला हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडेन”
राज्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार-हर्षवर्धन पाटील आले एकत्र; चर्चांना उधाण