Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली असून महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील या धक्कादायक निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे यांचा विजय; भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव

पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असं सांगतानाच इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करत आहे. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील जनतेने भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ या लोकसभेची कसर भरून काढू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या –

शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय खेचून आणला, उज्जल निकम यांना दिला पराभवाचा धक्का

अहमदनगरमध्ये विखे घराण्याला मोठा धक्का; निलेश लंकेंनी उधळला विजयाचा गुलाल

बारामतीकरांचा पाठिंबा लेकीलाच; सुनेत्रा पवार यांचा तब्बल ‘इतक्या’ मतांनी पराभव