आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत 2019 साली 72 तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवारांसोबत झालेला शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा गाैफ्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा : “WPL Auction 2023! सांगलीची स्मृती मानधना RCB च्या ताफ्यात, स्मृतीसाठी RCB ने मोजले ‘तब्बल’ इतके कोटी”
उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेंव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“Womens T-20 WC! मुंबईकर जेमिमाहची मॅच विनिंग खेळी, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय”
भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“ठाण्यात भाजपचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”