राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरेंची राज्य सरकारला विनंती

0
9

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्या आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा.” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा.

हे ही वाचा : “ठाकरेंचा दणका; शिंदे गटाशी जवळीक साधणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी”

सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा.

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल, याकडे राज्य सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावं, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याच्या कट्टर समर्थकानं केला भाजपमध्ये प्रवेश”

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, मराठी एकजूट…

अखेर 24 वर्षानंतर काँग्रेसला मिळाला गांधी कुटूंबाबाहेरचा अध्यक्ष; मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here