आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच मराठवाड्यातील सर्वच धरणं तुडूंब भरले असून अनेक नद्यांनी पात्र सोडल्यानं नद्यांचं पाणी शेतात शिरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी आघाडी सरकारकडे केली.
दरम्यान, पंचनामे होत राहतील. आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या, अशीही आक्रमक मागणी राज ठाकरेंनी सरकारकडे केली.
महत्वाच्या घडामोडी –
भर कार्यक्रमात भाजपचा नेता स्टेजवरून कोसळला; पहा व्हिडिओ
“केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”
जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले; पंकजा मुंडेंचा घणाघात
मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; नाशिकमध्ये 122 शाखाध्यक्षांची नियुक्ती