मोठी बातमी! अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

0
5

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी बहाद्दर म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला.

अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जय मालोकर याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ही बातमी पण वाचा : मनसे कार्यकर्त्यांचा मिटकरींच्या गाडीवर हल्ला; कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, अमोल मिटकरी अकोल्यात विश्राम गृहात गेले असताना बाहेर उभ्या असलेल्या कारला मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं होतं. यावेळी चांगलाच राडा झाला होता. या राड्यानंतर जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे जयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

राज ठाकरेंना कुणी सिरीयस घेत नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

अजित पवारांना धक्का; शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले ‘हे’ मोठे नेते करणार घर वापसी?

राज ठाकरे भाजपाच्या हातचं बाहुलं झालेत; ठाकरे गटाचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here