मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नका. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना दहशतीखाली ठेवत आहेत- रवी राणा
नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा टोला