आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दिल्ली : भारतीय जवानांचा एक जबरदस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जम्मु-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आणि जम्मू-काश्मीरच्या अग्रीम चौकीवर सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. कडाक्याच्या थंडीतही भारतीय सैन्याचे जवान हाती राष्ट्रध्वज घेऊन एक पारंपारिक नृत्य करत आहेत.
भारतीय सैन्याचे जवान ‘खुकुरी’ हा पारंपारिक नृत्य प्रकार सादर करत आहेत आणि एका जवानानं राष्ट्रध्वज हाती घेतला आहे. भारतीय जवानांचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला सलाम करत आहेत.
हे ही वाचा : शिवसेना आमदाराचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात…
दरम्यान, भारतीय सैन्याचे जवान तुफान बर्फवृष्टी होत असताना हाती राष्ट्रध्वज घेऊन एक पारंपारिक नृत्य करत असल्याचा व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे.
#WATCH Troops of the Indian Army performed ‘Khukuri Dance’ in the snow-clad ranges of the Tangdhar sector in the Kupwara district of north Kashmir.
Video source: Indian Army pic.twitter.com/9Rp3V1xNUB
— ANI (@ANI) January 8, 2022
महत्वाच्या घडामोडी –
मॅडम सोबत विद्यार्थ्याने केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ
‘…पण गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंचा पलटवार