एवढं चांगलं काम केलं तरी टीका, विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे; संजय राऊतांचा हल्लाबोल

0
192

मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या कामाचं विशेष कौतुक केलं. मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावं, कारण विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे आहेत, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

कोरोनाच्या या संकटात प्रत्येक ठिकाणी सरकार पोहचेल याची खात्री देता येत नाही. तर दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्था असो की, सर्वसामान्य व्यक्ती, झोकून देऊन काम करत आहेत. तसेच शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालय उभारून रुग्णांना सेवा देणं ही मोठी राष्ट्रसेवा असल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचं उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“नवाब मलिक प्रकरण गंभीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी चाैकशी करा”

पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली- नाना पटोले

कोण रे बाबा तू सल्ला देणारा; निलेश राणेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल

“…पर मुख्यमंत्री खाली हांथ गए और खाली हांथ आए”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here