बाॅलिवूडकरांवर कोरोनाचं सावट! बॉलिवूडचे आणखी 2 मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

0
190

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, निर्माते संजय लीला भन्साळी नंतर आता बाॅलिवूडमधील आणखी 2 मोठ्या कलांकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

आता अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेते आशिष विद्यार्थी यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, तारा सुतारियाला कोरोना संसर्ग झाला आहे. नुकताच ताराने तिच्या आगामी ‘तडप’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाल्याचं कळतं आहे.

अभिनेते आशिष विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आशिष विद्यार्थी यांनी सोशल मिडियावर याबाबतची माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तर, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी देखील स्वतःची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली”

“…दुभत्या म्हशी च्या लाथा गोड”; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

…मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका- संजय राऊत

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here