आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : शिर्डी मतदारसंघातील गणेशनगर साखर कारखान्यावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या आठ वर्षापासून सत्ता आहे. यावेळी मात्र विखे पाटील यांना काँग्रेसनं मोठा धक्का दिला आहे.
भाजपच्या कोल्हे गटाने ऐनवेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हात हातात घेतला आणि परीवर्तन मंडळाच्या माध्यमातून विखेंविरोधात खिंड लढवली. त्यामुळे 19 पैकी 18 जागा मतदारांनी कोल्हे थोरात गटाच्या पारड्यात टाकत विखे पाटलांना मोठा धक्का दिला.
ही बातमी पण वाचा : शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदे अपात्र होणार?; ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान, म्हणाले…
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तेव्हापासून पक्षांतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला. कोल्हे यांनी विधानसभेच्या पराभवाचा गणेशनगर साखर कारखान्यात वचपा काढल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी…
देवेंद्रजी, हिंमत असेल तर…; उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!