Home महाराष्ट्र शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदे अपात्र होणार?; ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम...

शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदे अपात्र होणार?; ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत, मात्र आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार का?, या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी…

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, शिंदे गट हा शिवसेनेचा अधिकृत पक्ष आहे. शिंदे गटालाच अधिकृत पक्षाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मनिषा कायंदे यांची अपात्रता मानली जाणार नाही, असं उज्वल निकम यांनी यावेळी म्हटलं. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.

मनिषा कायंदेंचा युक्तिवाद असा असू शकतो की, मी शिवसेनेतच आहे. मी शिवसेना सोडली नाही. पण हा निर्णय अर्थात विधान परिषदेच्या सभापतींना घ्यायचा आहे. 10 व्या परिशिष्टानुसार, मनिषा कायंदे अपात्र ठरतात की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय विधान परिषदेचे सभापतीच घेऊ शकतात, असंही उज्वल निकम यांनी यावेळी म्हटलंं.

महत्त्वाच्या घडामोडी –

देवेंद्रजी, हिंमत असेल तर…; उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!

“सांगली मर्डर! राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी एक अल्पवयीनसह, चौघांना अटक, आरोपींनी दिली धक्कादायक कबुली”

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; भाजपचा उध्दव ठाकरेंना सवाल