Home महाराष्ट्र “सांगली मर्डर! राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी एक अल्पवयीनसह, चौघांना अटक, आरोपींनी दिली...

“सांगली मर्डर! राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी एक अल्पवयीनसह, चौघांना अटक, आरोपींनी दिली धक्कादायक कबुली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला. यानंतर त्यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता अल्पवयीन मुलासह, चाैघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सांगलीत 2019 मधील महेश नाईक खून प्रकरणात मोक्कामध्ये जेलमध्ये असलेला आरोपी सचिन डोंगरे याला जामीन होऊ न देण्यासाठी तसेच त्याला बाहेर येता येऊ नये, यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून मुल्ला यांचा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक; भाजपचा उध्दव ठाकरेंना सवाल

सनी कुरणे (वय 23), विशाल कोळपे (वय 20), स्वप्नील मलमे (वय 20) असे तीन आरोपीची नावे आहेत. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समवेश आहे. या चौघांनी शुक्रवारी नालसाब रहात असलेल्या ठिकाणाची रेकी केली होती. तसेच मुल्ला यांच्या हालचालीची माहिती घेतली होती. यानंतर काल रात्री 8.15 च्या सुमारास या चौघांनी मुल्ला यांच्यावर गोळीबार करीत कोयत्याने हल्ला चढवत तिथून पलायन केलं.

घटनेनंतर तातडीने, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तीन पथकाद्वारे तपास सुरू केला. यामध्ये आज सकाळी या हल्लेखोरांना पकडण्यात यश आलं. या चौघांनी नालसाब मुल्ला यांच्या खुनाची कबुली दिली असून सचिन डोंगरे याच्या सांगण्यावरूनच खून केल्याचं प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी 24 तासाच्या आताच या गुन्ह्याचा छडा लावला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

 राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर…; राष्ट्रवादीची शिंदे – फडणवीस सरकारवर टीका

“ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधीच, आणखी एका शिंदेंनी सोडली साथ”