“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”

0
371

सोलापूर : कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेसने 8 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु केलं आहे. काल शुक्रवारी सोलापूरात महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मात्र, आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं प्रणिती शिंदे यांच्यावर आज गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोलापूर शहरातील पेट्रोल पंपावर काँग्रेसने काल आंदोलन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेणाच्या गोवऱ्या पार्सल पाठवण्यात आल्या. या आंदोलनात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो”

“हालचाली तर वाढणारच”; शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”

“मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशिर्वाद आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here