“इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी”

0
297

इचलकरंजी : गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव दररोज नवी उसळी घेत आहेत. याच इंधनाच्या दरवाढीविरोधात आक्रमक होत इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढ कमी करावी या मागणीसाठी इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने मलाबादे चौक ते प्रांत कार्यालय या प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढी विरोधात निषेधात्मक घोषणा देत निदर्शने केली.

दरम्यान, काँग्रेस सत्तेवर असताना इंधन दरवाढीवर टीका करणारे भाजपचे मंत्री आता मात्र बोलती बंद करून शांत आहेत, अशी टीका काँग्रेसने यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी-

…त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार?; भातखळकरांची शिवसेनेवर टीका

महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा- देवेंद्र फडणवीस

महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता- निलेश राणे

शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here