मुंबई : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, असं मोठं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला. यावर शिवसेना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या इशाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याने प्रत्यक्ष विठोबा माऊलीसुद्धा सावध झाली असेल. विठोबा माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला आहे. माऊलीचा आशीर्वाद नसता तर हे सरकार आलंच नसतं. त्यांनी जर विठोबा माऊलीला साकडं घातलं असेल तर विठोबा माऊली पाहील ना. पण आज जनता कोरोना संकटात सापडली आहे. या काळात सरकार पाडणं, सरकार घालवणं, सरकार अस्थिर करणं या सगळ्यातून बाहेर आलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, मंगळवेडाची किंवा पंढरपूरची पोटनिवडणूक आहे. देवेंद्र फडणवीस तिथे प्रचारासाठी गेलेत. त्यांनी प्रचार करावा. जनता जो काही निर्णय घ्यायचाय तो निर्णय घेईल. पण एक सांगतो, विरोधी पक्षाला अशाप्रकारची भाषणं करावी लागतात. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना लोकांमध्ये विश्वास आणण्यासाठी किंवा त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषणं करावी लागतात. तसेच राजकारणात अशा भाषणांना जेवढं महत्त्व द्यायचं ते तेवढंच द्यायचं. ते सरकार जेव्हा पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, मी बघतो- देवेंद्र फडणवीस
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?
“…तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”