Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही”

“मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही”

मुंबई : मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही. माझं काम बोललं पाहिजे. ते दिसलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. मी दिसलो नाही तरी चालेल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जे आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी इतर राज्यांनी काय केलं हे पाहावं. राज्य सरकार गोंधळलेलं नाही. आपण मोजून मापून पाऊल टाकत आहोत. आपण मुंबईत तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार केले, असं कोणत्या राज्यानं केलं? आपल्याकडे व्हेंटिलेटर्सवर असलेले रुग्णही परत आले आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, करोनाच्या उपचारात औषधांचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे. अनुभव संपन्न असलेले लोक आज आरोप करत आहेत. माझ्याकडे प्रशासनाचा अनुभव नसला तरी माझ्याकडे आत्मविश्वास आहे. मी बिलकुल गोंधळलेलो नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आता मुंबईत अमिताभ, शाहरुखऐवजी तुझ्या घरासमोर गर्दी होणार; सोनू सूद म्हणतो…

…या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांच भाजपला आव्हान

…पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण