मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.. पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार!

0
243

मुंबई : मुंबई महानगर पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीजनिर्मिती करण्याची परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महापालिकेला आपलं स्वतंत्र वीजनिर्मीती केंद्र सुरू करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जलाशयातून ही वीज निर्मिती केली जाईल.

मुबंई महानगरपालिकेच्या 2002 च्या वचननाम्यात मध्यवैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर त्यातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र विजनिर्मीती केंद्र सुरू करू, असं वचन शिवसेनेनं दिलं होतं.

दरम्यान, याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील. असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही”

-नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांची मंजूरी

-27 जानेवारीला पंकजाताईसोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार- प्रितम मुंडे

-बंदी घालण्यात आलेल्या पॉर्न वेबसाईट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here