महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगलं नाही. शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे. अशी टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी राज्य सरकारवर केली आहे. भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्त्वात आहे का? महाराष्ट्र करोनाच्या बाबती आता चीनला मागे टाकेल अशी भीती व्यक्त होते आहे. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का? असा सवाल राजनाथ सिंग यांनी यावेळीा उपस्थित केला.
दरम्यान, आम्ही करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. सहकार्य करतो आहोत. तरीही या सरकारला करोनाग्रस्तांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही ही बाब दुर्दैवी आहे असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचं राज्य सरकारकडे कसलंच नियोजन आणि धोरण नाही- राजू पाटील
“शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर”
“…तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे”
मनसेची आजची राज्यातील परिस्थिती बिकट- अशोक चव्हाण