मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. यावर भाजपच्या अधिकृत ट्विटर हँटलद्वारे एक ट्विट करण्यात आलं आहे.
केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता शरद पवार यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असं भाजपच्या ट्विटर हॅंडलद्वारे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री @OfficeofUT हे आता @PawarSpeaks यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. #ResignanilDeshmukh pic.twitter.com/mKH8n77P1B
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवार साहेब आता तरी खोटं बोलणं बंद करा आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या”
अनिल देशमुख 15 फेब्रुवारीला काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…
भारत विरूद्ध इंग्लंड वनडे! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय
राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होतेच; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला