मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे- देवेंद्र फडणवीस

0
284

मुंबई : राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरुन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे,”  अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. लॉकडाउनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटलं झालं सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं. अनेक दुकानदारांचा 7 ते 2 या वेळेला विरोध असून 9 ते 4 करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सरकारनं या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- संभाजीराजे छत्रपती

मी 39 वर्षे शिवसेनेत होतो, मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे, हे मला माहितीये- नारायण राणे

…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल- नाना पटोले

“करोनाचा निर्णय म्हणजे खो-खो चा खेळ वाटला की काय सरकारला?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here