आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगांव : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून बोदवड बाजार समितीचा गड कायम राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना यश आलं आहे.
भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का देत बोदवड बाजार समितीवरील 18 पैकी 17 जागांवर एकनाथ खडसे यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलने विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे.
ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या आत्मचरित्र्यात भाजप-शिवसेनेबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…
भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात खडसेंच्या पॅनलने आघाडी मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे.
बोदवड बाजार समितीवर गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व कायम आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही एकनाथ खडसे यांचा प्रभाव कायम असल्याचे या निकालातून दिसून आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
नाना पटोलेंना मात देण्यासाठी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती, मात्र काँग्रेसनं गड राखला”
“ना रोहित पवार, ना राम शिंदे; कर्जत बाजार समितीत कोणी मारली बाजी?”
“ठाकरेंच्या शिलेदाराकडून, शिंदेंच्या शिलेदाराचा करेक्ट कार्यक्रम, मालेगावात ठाकरेंचं वर्चस्व”